महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध,वकृत्व स्पर्धेचे आयोजन
महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध,वकृत्व स्पर्धेचे आयोजन
राजा प्रसेनजित संस्था व नेहरू युवा मंडळाचा पुढाकर
संस्था अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर यांची माहिती
वाशिम(प्रतिनिधी-जितेश गायकवाड )
(युगनायक न्युज नेटवर्क )
वाशिम येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथिल सामाजिक,शैक्षणिक, शासकीय,निमशासकीय विविध उपक्रमात सहभागी होणारी संस्था राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक,शिक्षण बहुउद्देशिय संस्था केकतउमरा व युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळ केकतउमरा यांच्या पुढाकाराने राष्ट्रपिता महात्मा फुले, व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित भव्य जिल्हास्तरीय निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादुर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पुढे म्हटले की,या स्पर्धेत निबंध विषय (१)पाण्याची बचत काळाची गरज,(२) पाण्याचा वापर काटकसरीने केल्याचे फायदे हे दोन विषय आहेत.यापैकी कोणत्याही एका विषयावर दोनशे ते अडीचशे शब्दात सुवाच्य अक्षरात लिहून या 7507271542 वॉट्सअप नंबरवर पिडिफ करून दिनांक 15 एप्रिल पर्यंत पाठविणे. वकृत्व स्पर्धेत विषय (१) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पाण्याविषयी विचार,(२) महात्मा फुले यांचे जलसंधारन बाबत धोरण हे दोन विषय आहेत.या दोन पैकी कोणत्याही एका विषयावर आपले वकृत्व सादर करून 3 मिनिटांचा व्हिडिओ काढून 7507271542 या नंबरवर दिनांक 15 एप्रिल पर्यंत पाठविणे.या दोनही स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या वतीने प्रथम,व्दितीय,तृतीय येणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक महात्मा फुले,व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र असलेले सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुस्तक भेट देवून गणमान्य व्यक्तीच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे.म्हणून महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली जयंती आपण विचारातून साजरी करूया,या हेतूने संस्थेच्या वतीने या निबंध, वकृत्व स्पर्धेचे जिल्हास्तरीय भव्य आयोजन करण्यात आले आहे.म्हणून या सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादुर यांनी केले आहे.सदर स्पर्धेत वयाची अट नाही कोणालाही सहभागी होता येणार आहे.सर्वच सहभागी स्पर्धकाला आकर्षक सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME