बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, रिठद बंद असल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक व्यवहार खोळंबले. बँकेने पर्यायी व्यवस्था सुरु करावी -अॅड.भारत गवळी यांची मागणी
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, रिठद बंद असल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक व्यवहार खोळंबले.
बँकेने पर्यायी व्यवस्था सुरु करावी -अॅड.भारत गवळी यांची मागणी
वाशिम:(युगनायक न्युज नेटवर्क)
रिठद.मागील काही दिवसापासून बँक ऑफ महाराष्ट्र बँक कायमची बंद असल्यामुळे रिठद परिसरातील सामान्य जनतेचे बँकेतील आर्थिक व्यवहार बँक बंद असल्याने खोळंबले असून सामान्य जनतेला हक्काचे पैसे बँकेत असून सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी तसेच लॉकडाउन मुळे सामान्य जनता २४तास घरीच असल्याने त्यांचा घरातील खर्च वाढला असुन घरात लागणाऱ्या वस्तू ७ ते ११या वेळेत विकत घ्याव्या लागतात तसेच दवाखान्यात होत असलेला खर्च पाहता बँक ऑफ महाराष्ट्र बंद मुळे सामान्य जनता आथिर्क अडचणीत आली आहे त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद त्वरीत सुरु करावी अन्यथा बँकेने सामान्य जनतेसाठी पर्यायी व्यवस्था सुरु करावी.
बोरोबर दादा खरच खुप अडचण झाली बैंक मुळे
ReplyDelete