ग्राम गोवर्धन येथील २०० कुटुंबाला भाजीपाला वाटप सौ. किरणताई गिर्हे यांचा मदतीचा हात
ग्राम गोवर्धन येथील २०० कुटुंबाला भाजीपाला वाटप
सौ. किरणताई गिर्हे यांचा मदतीचा हात
वाशिम - रिसोड तालुक्यातील ग्राम गोवर्धन येथे कोरोनाबाधीतांची संख्या वाढल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. टाळेबंदीमुळे ग्रामस्थांची उपासमार होत आहे. अशा कठीण प्रसंगी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्हे यांनी गावातील तब्बल २०० ़कुटुंबांना ८ दिवस पुरेल एवढा भाजीपाला वाटप करुन माणूसकीचा परिचय दिला आहे.
ग्राम गोवर्धन येथे गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली असून जवळपास ३० ते ३५ जण दगावले आहेत. त्यामुळे गावात प्रचंड दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्थ आपआपल्या घरात बंद असल्यामुळे त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेवून सौ. किरणताई गिर्हे यांच्या पुढाकारातून गावातील २०० कुटुंबांना ८ दिवस पुरेल एवढया भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.
तसेच कोरोनाबाधितांना ऑक्सीजन सेवा, रेमेडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी सौ. गिर्हे ह्या गेल्या १५ दिवसापासून अहोरात्र झटत असून गरजु रुग्णांना मदत मिळवून देत आहेत. ग्राम गोवर्धन येथील आरोग्य उपकेंद्रात अत्यंत तुटपुंज्या सुविधा आहेत. सदरील उपकेंद्रावर रुग्णांना सर्व सुविधा त्वरीत मिळाव्या यासाठी सौ. गिर्हे यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांशी संपर्क साधून गावकर्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. मात्र याठिकाणी कोणत्याच प्रकारच्या आरोग्य सुविधा गावकर्यांना मिळत नाहीत. त्यामुळे यासंबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सौ. गिर्हे यांनी दिला आहे. यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम झगडे, सर्कल प्रमुख विनोद अंभोरे, ग्रा. पं. सदस्य संदीप अंभोरे, नागसेन धांडे, विजय इंगोले, आतिश अंभोरे, जगदीश देबाजे, कळासरे, मानमोठे व सम्यक संघटनेचे पदाधिकारी हजर होते. मिळालेल्या मदतीमुळे गावकर्यांनी गिर्हे यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME