जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य निवडीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती
सदस्य निवडीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



वाशिमदि. २६ (युगनायक न्युज नेटवर्क) : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या १५ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणाऱ्या ३ नामवंत संस्थांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यासाठी ११ जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्ज, प्रस्ताव शासनास सादर करावयाचे आहेत. याकरिता ज्या संस्थांना आपले अर्ज, प्रस्ताव सादर करावयाचे आहेत, त्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून सदर अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा व संपूर्ण भरलेला अर्ज ४ मार्च २०२१ पर्यंत तहसील कार्यालात जमा करावा.
प्राप्त स्वयंसेवी संस्थांचे अर्ज, प्रस्तावांची तपासणी करण्यात येवून संस्थेचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनास सादर करण्यात येईल. प्रस्ताव सादर केला म्हणून संबंधित अशासकीय संस्थेची नियुक्ती झाली, असे ग्राह्य धरता येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीमार्फत कळविण्यात आले आहे.
 
 

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू