वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न.
वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न. वाशिम: (युगनायक न्युज नेटवर्क)वाशिम येथील केमिस्ट भवन लाखाळा येथे डॉ गजानन हुले जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. अरुंधतीताई सिरसाट वाशिम जिल्हा प्रभारी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठक महिला आघाडी किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ ज्योतीताई इंगळे, महासचिव सौ सुशीलताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल गरकल, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे, समाधान भगत, डॉ रवी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आढावा बैठकी मध्ये वाशिम जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली घेण्यात याव्या असे आदेश मा श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. त्यानुसार सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे अस्या सूचना मा अरुंधतीताई सिर...