Posts

Showing posts from August, 2025

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

Image
  अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार  सांगली. (पब्लिक न्युज नेटवर्क ) दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06:00 वा तांदुळवाडी गावच्या हद्दीतील पुणे कोल्हापूर हायवे रोडवर अपघात झाला त्या अपघातात अं वय 40 वर्ष वयोगटातील वेडसर महिला रस्त्याने जात असताना तिला अज्ञात वाहनाने धडक दिली व तिला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये न नेता तिला जागेवर आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात माहिती वैशाली राजाराम पाटील (तांदुळवाडी ) यांनी कुरळप पोलीस स्टेशनं ला देऊन अज्ञात गाडी चालकावर गुन्हे नोंदविन्यासंदर्भात पोलीस स्टेशनं ला माहिती दिली. भारतीय न्याय संहिता कलम 281,125(अ ), 125(ब )M. V. C. ACT 184,134(अ ), 134(ब )अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. सदर घटनेत कुणाला या संदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास तपासी अंमलदार पोलीस हवालदार दिपक खोमणेयाच्या शी संपर्क करावा संपर्क क्र.8421937373

येवता येते छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत माननीय तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या हस्ते प्रारंभ.

Image
  येवता येते छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत माननीय तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या हस्ते प्रारंभ. रिसोड   (पब्लिक न्युज नेटवर्क ) रिसोड तालुक्यातील मौजे येवता येथे काल दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मा.तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या हस्ते 100 वृक्ष लागवड. करण्यात आली वृक्षवल्ली आम्हा सोयरी या मनीप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाची अत्यंत आवश्यकता असून झाडे लावणे आणि जगवणे हे येणाऱ्या काळासाठी अत्यंत आवश्यक आहे याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत काल 100 अक्षर लागवड करण्यात आली गावातील जगदंबा माता परिसर व ढोरखेड रस्ता या परिसरात सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच गावातील नागरिकांच्या सहकार्याने आणि तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आली दिवसेंदिवस पाणी समस्या खूप गंभीर होत चाललेली आहे जर झाडे जगले नाहीत तर पाऊस सुद्धा पडणार नाही आणि पर्यायाने शेती सुद्धा पिकणार नाही आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा भासणार म्हणून सध्या आहे ती झाडे तोडू नये व प्रत्येकाने शक्य असेल त्या पद्धतीने झाडे लावली पाहिजेत आणि त...