येवता येते छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत माननीय तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या हस्ते प्रारंभ.
येवता येते छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत माननीय तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या हस्ते प्रारंभ.
रिसोड (पब्लिक न्युज नेटवर्क ) रिसोड तालुक्यातील मौजे येवता येथे काल दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मा.तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या हस्ते 100 वृक्ष लागवड. करण्यात आली वृक्षवल्ली आम्हा सोयरी या मनीप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाची अत्यंत आवश्यकता असून झाडे लावणे आणि जगवणे हे येणाऱ्या काळासाठी अत्यंत आवश्यक आहे याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत काल 100 अक्षर लागवड करण्यात आली गावातील जगदंबा माता परिसर व ढोरखेड रस्ता या परिसरात सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच गावातील नागरिकांच्या सहकार्याने आणि तहसीलदार तेजनकर मॅडम यांच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आली दिवसेंदिवस पाणी समस्या खूप गंभीर होत चाललेली आहे जर झाडे जगले नाहीत तर पाऊस सुद्धा पडणार नाही आणि पर्यायाने शेती सुद्धा पिकणार नाही आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा भासणार म्हणून सध्या आहे ती झाडे तोडू नये व प्रत्येकाने शक्य असेल त्या पद्धतीने झाडे लावली पाहिजेत आणि त्याचा संगोपन केलं पाहिजेत असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन देशमुख यांनी व्यक्त केले. संपूर्ण तालुक्यामध्ये हे अभियान चांगले पद्धतीने सर्वांनी राबवावे असे आवाहन तेजनकर मॅडम यांनी केले आहे या अभियानाला येवता येथील नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला यावेळी येवता गावचे सरपंच, ग्रामसेवक,तलाठी गोटे साहेब आजी,माजी ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME