Posts

Showing posts from September, 2022

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Image
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवा मुंबई, (युगनायक न्युज नेटवर्क )दि. 29 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी  https:// admissions.tiss.edu  या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तर, जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आध...

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवा : हुसेन कुरेशी

Image
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवा : हुसेन कुरेशी  बुलढाणा (प्रतिनिधी) : राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड तसेच पश्चिम बंगाल राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा भविष्य उज्ज्वल केला आहे. याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करावी.या  एकमेव संविधानीक मागणी साठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने मार्फत दिनांक २१/०९/२०२२ रोजी जुनी पेन्शन संदेश बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरु करण्याची मागणीसाठी आयोजित बॉईक रॅली  ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचा जाहीर पाठींबा आहे.म्हणुन जिल्हाभरातील हजारो जुनी पेन्शन हक्क सेनेचे पेन्शन सैनिक, शिक्षक सेनेचे शिक्षक सैनिक यांनी ही रैली अभूतपूर्वरित्या यशस्वी करण्यासाठी व शासनाला आपल्यावरील अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी उद्या दिनांक २१/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आपण सर्वांनी  जिजामाता प्रेक्षकगार बुलढाणा येथे एकत्रित व्हायचं आहे. ही भव्यदिव्...