आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन
आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड: (युगनायक न्युज नेटवर्क) दि 07. रोजी भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), नांदेड आणि धान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरसेटी प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा उद्देशाने भोकर तालुक्यातील ग्राम हळदा येथे उद्योजकता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात ज्ञानदेवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन लरून झाली, तदनंतर मान्यवरांचे स्वागत उपस्थितांनी केले. यामध्ये उपस्थितांना आरसेटी अंतर्गत आयोजित होणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, उपलब्ध सुविधा, पात्रता इत्यादीबद्दल माहिती देऊन ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील गरजूंनी युवक-युवतींनी, बचत गटातील महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रदीप पाटील, संचालक आरसेटी नांदेड यांनी केले तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना इत्यादीबद्दल सर्वांनी या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला आरसेटी नांदेड चे संचालक प्रदिप दामुजी पाटील, धान फाउंडेशन चे विभागीय समन्वयक सागर शिंदे, आरसेटी फॅकल्टी आशिष अशोक राऊत, धान फाउंडेशन चे समन्वयक मयूर ठवळी, हळदा ग्राम पंचायत सरपंच बापूराव नागमोड, सदस्य चंद्रकांत नागमोड आणि ग्राम हळदा येथील बचत गटातील महिला, बेरोजगार युवक-युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीयेतेकरिता बाळासाहेब डोंगरे, मीरा दांगट यांनी परिश्रम घेतले तर संचालन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी मयूर ठवळी यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME