पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे आमदार श्र्वेता महालेy पाटील यांनी घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे आमदार श्र्वेता महालेy पाटील यांनी घेतली भेट
लोणार. प्रा लुकमान कुरैशी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे चिखली मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्र्वेता महाले पाटील यांनी भेट घेऊन महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीची विशेष ओळख असलेल्या पैठणीचा शेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला. यावेळी आमदार श्र्वेता महाले पाटील यांनी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे पाणी पेनटाकळी पर्यंत आणण्याची तसेच चिखली येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मागणी केली.
विदर्भातील प्रस्तावित असलेल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये पैनगंगा नदीवर असलेल्या मध्ये पेनटाकळी धरणामध्ये आणून नेहमीच दुष्काळग्रस्त असलेले दक्षिण बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान पत्र देऊन केली. सोबतच बुलडाणा जिल्हा व पश्चिम विदर्भात सोयाबीन पीक मोठया प्रमाणात घेतल्या जात असल्याने चिखली येथे शासकिय सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणण्याची सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पहिल्यांदा निवडून आलेल्या विधान सभा सदस्यांकरिता संसदेच्या "पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस" (PRIDE) (Erstwhile BPST) या संस्थेमार्फत नवी दिल्ली येथे दिनांक ५ व ६ एप्रिल २०२२ रोजी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आलेला आहे. सदर अभ्यास वर्गात आमदार श्र्वेता महाले पाटील सहभागी झालेल्या आहेत. यावेळी आमदार श्र्वेता महाले पाटील सोबत महीला आमदारांचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME