नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान


नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान

औरंगाबाद. (प्रतिनिधी ) / युगनायक न्युज नेटवर्क 

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिकलठाणा औरंगाबाद येथे ग्रामीण व शहरी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था संचलितskillup india  क्लासेस मार्फत  नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी जाधव( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बार्टी ) मुलींना प्रबोधन केले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेले वाक्य त्यांनी प्रत्यक्षात महिलांना समजावून सांगितले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी किती कष्ट केले हे महिलांना समजावून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी समाज कल्याण च्या विविध योजनांचे व  (बार्टी) च्या विविध योजनांचे मार्गदर्शन केले 

🙏🏻प्रमुख पाहुणे =म्हणून डॉक्टर राजश्री पाटील साईनाथ हॉस्पिटल( स्री रोग तज्ञ) वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिलांची (परिचारिकां) किती गरज आहे मार्गदर्शन केले 

दामिनी पथक च्या आशा गायकवाड, महिला आणि मुलींनी निर्भीड बना हा संदेश सर्वांना दिला मॅडम मनिषा बनसोडे,

 तसेच किशोरी प्रकल्पाच्या सुनिता बोर्डे ,व कसारे मॅडम 

महिंद्रा होम फायनान्स चे अधिकारी सतीश पाटील तसेच

 लोकमतचे हिवराळे सर उपस्थित होते यावेळी संस्थेच्या सचिव शीतल जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात महिलांनी विद्यार्थ्यांनी वंचित, परित्यक्ता, विधवा ,बालविवाह झालेल्या मुलींसाठी जे विद्यार्थी मुलं-मुली परिस्थितीमुळे पैशाअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नाही अशा महिला व मुलींना फक्त प्रोत्साहन देऊन नाही तर प्रत्यक्ष कृती करुन कार्य केले आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रवेश करून देणे कमी शिक्षण असेल त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करणे मोफत त्यांना महाविद्यालयीन प्रवेश करून देणे इत्यादी विविध योजना मॅडम त्यांच्या संस्थेमार्फत राबवतात कमी शिक्षण असल्यामुळे परिस्थिती बिकट असल्यामुळे खूप महिला समाजात मागे राहत आहे परंतु त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या हातात कौशल्य असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी शिलाई मशीन कोर्स, ब्युटिशियन कोर्स, नर्सिंग असिस्टंट कोर्स केक मेकिंग कोर्स, असे विविध कोर्सेस घेऊन त्यांना उद्योग उभारणीसाठी मदत केली जाते  व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले 

सूत्रसंचालन - दीक्षा मोकळे व्यवस्थापन - कोमल साळवे आभारप्रदर्शन - प्रियंका क्षीरसागर परिश्रम - श्रद्धा मॅडम, पवन सर, अभिषेक सानप, मयुरी कुलकर्णी, या सर्वांनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू