वृक्ष वाचविण्यासाठी 'बिहार पँटर्नचा' अवलंब! एस एम सी इंग्लिश स्कूलचा उपक्रम :चिमुकल्यांनी केली पर्यावरणाबाबत जनजागृती

 वृक्ष वाचविण्यासाठी 'बिहार पँटर्नचा' अवलंब!  एस एम सी इंग्लिश स्कूलचा उपक्रम  :चिमुकल्यांनी केली  पर्यावरणाबाबत जनजागृती   




  वाशीम  (युगनायक न्युज नेटवर्क ):पर्यावरण क्षेत्रात जनजागृती करण्यात अग्रगण्य असणार्‍या स्थानिक एस एम  सी इंग्लिश वाशीमच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी व प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात जल संधारणाच्या कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या परिसरात बिहार पँटर्नचा  अवलंब करण्यात आला. या अंतर्गत झाडाच्या बुंध्याशी एक फुट अंतरावर खड्डा करुन त्यामध्ये बिसलरी किंवा साध्या बाटलीला बुडाशी एक छिद्र पाडण्यात आले असून त्यात सुतळीची, कापसाची किंवा कापडाची एक वात तयार करुन हि वात झाडाच्या बुंध्याशी ठेवून बाटलीत पाणी भरुन ठेवल्या नंतर हे पाणी जवळपास  वातीच्या माध्यमातून  झाडांना सलाईन सारखे काम करत असून   हे पाणी झाडांना दोन ते तीन दिवस  पर्यंत सहज पुरते .सध्या असणारा तिव्र उन्हाळा  व तापमान जवळपास ४२ अंशा पर्यंत पोहचले आहे तसेच संभाव्य  पाणी टंचाई मूळे झाडांना जे पाणी इतर माध्यमातून दिले जाते त्याच्या जवळपास ९० टक्के पाण्याच बाष्पीभवन होते  परंतु या पध्दतीचा अवलंब केल्यामुळे पाण्याची बचत तर होतेच शिवाय वृक्षांचे संवर्धन सुद्धा होते. अशा प्रकारच्या बिहार पँटर्नचा अवलंब इतरांनी करून तीव्र उन्हापासून व  संभाव्य पाणी टंचाई पासुन झाडांचे संरक्षण व संवर्धन  करावे असे आवाहन प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे  .हा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी  राष्ट्रीय हरित सेनेचे चिमुकले व शाळेतील माळी विशाल भंगी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू