रमजान निमित्त दिघा विभागात मुस्लिम बांधवाना फळ वाटप..!

 रमजान निमित्त दिघा विभागात मुस्लिम बांधवाना फळ वाटप..!




ठाणे /नवी मुंबई विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर (अन्नू) आंग्रे व दिघा महिला तालुका अध्यक्ष गौरी किशोर आंग्रे यांच्या माध्यमातून रमजान निमित्त दिघा विभागातील मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जाऊन फळ वाटप करण्यात आले.दिघा विभागतील एकूण ३५०मुस्लिम बांधवांच्या घरी फळ वाटप करण्यात आले.

      या प्रसंगी विभागातील मुस्लिम बांधवानी आंग्रे यांना आशिर्वाद देत.आमच्या सुखा दुःखात सामील होणार आमचा भाऊ आम्हांला भेटला आहे अशी प्रतिक्रिया तेथिल मुस्लिम बांधवानी दिली.

           या प्रसंगी अल्पसंख्यांक अध्यक्ष ऐरोली विधान सभा सुलतान अन्सारी,समाजसेवक पप्पू पटेना,समाजसेवक रवी गायकवाड व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू