आदमी पार्टीच्या तालुका संयोजकपदी डॉ . प्रल्हाद कोकाटे यांची नियुक्ती.
आदमी पार्टीच्या तालुका संयोजकपदी डॉ . प्रल्हाद कोकाटे यांची नियुक्ती.
रिसोड (प्रतिनिधी )- युगनायक न्युज नेटवर्क
दि . ५ एप्रिल २०२२
● रिसोड मालेगांव मतदारसंघात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वंचित व दिव्यांग बांधवाच्या हितासाठी आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत असणारे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वेळोवेळी मांडत असून त्यांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्याचे काम करतात . दिव्यांग विकास परिषदेच्या माध्यमातून वाशिम जिल्हयातील सर्वच तालुक्यातील दिव्यांग व वंचित बहुजनांच्या हितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ . प्रल्हाद कोकाटे यांची आम आदमी पार्टीच्या रिसोड तालुका संयोजक पदी वाशिम जिल्हा संघटक मा.राम पाटील डोरले यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती केली आहे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व वंचित बहुजनांच्या व दिव्यांग बांधवांच्या कामासाठी सतत आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू असते वाशिम व बुलडाणा जिल्हयात त्यांच्या मूकबधिर मुलांच्या शाळा असून ८० निराधार मूकबधिर मुलांचे ते स्वखर्चाने पालनपोषण करतात त्याचबरोबरीने ते दिव्यांगाचे प्रश्न शासन दरबारी त्याची एक मोठी चळवळ तयार करणार असल्याचे तसेच शेतकरी , शेतमजूर , आशा सेविका , अंगणवाडी सेविका व मदतनीस , संगणक परिचालक , निराधार व्यक्ती व दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले . बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणाऱ्या बोगस प्रमाणपत्र धारकांचा शोध घेऊन शासनाच्या निदर्शनास आणून देऊन ख ? या दिव्यांगाना लाभ मिळवून देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आमच्या प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME