बजेटचा कायदा करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत व एन.डी.एम.जे संघटनेची मंत्रालयात संयुक्त बैठक संपन्न
बजेटचा कायदा करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत व एन.डी.एम.जे संघटनेची मंत्रालयात संयुक्त बैठक संपन्न
मुंबई - प्रतिनिधी युगनायक न्युज नेटवर्क बौद्ध,अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या (दलित आदिवासी) यांच्या प्रगतीचा निधी इतरत्र वळवू नये.निधी अखर्चित ठेवू नये म्हणून मंत्रालयात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांनी बजेटच्या कायद्याची मागणी करत केंद्र सरकार व राज्यसरकार यांची अर्थसंकल्पीय निधीची तरतूद,इतर राज्यांनी बनवलेला बजेटचा कायदा,सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांचे अपयश त्यातील जाचक अटी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी,लोकसंख्येच्या प्रमाणात तुटपुंजा निधी,अन्याय अत्याचार या विषयांवर आकडेवारीसह सद्यस्थिती ऍड.डॉ.केवलजी उके यांनी आक्रमक व परखडपणे मांडली.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संघटनेच्या मागण्या कॅबिनेट बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे शशी भाऊ खंडागळे,बंदिश सोनवणे,विजय कांबळे,ऍड.प्रवीण बोदडे,संदेश भालेराव,ज्योतीताई बैठकीसाठी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME