चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती अकोला येथे मोठया उत्साहात साजरी
चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती अकोला येथे मोठया उत्साहात साजरी
अकोला. (विशेष प्रतिनिधी )चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती निमित्त अशोक अष्टमीला शनिवार दि./९ /४/२०२२ ला संध्याकाळी ७ वाजता,भव्य भीम गीताचा व भोजन दानाचा,तीस किलो लड्डू वाटण्याचा कार्यक्रम भीम नगर रमाबाई चौक जुने शहर अकोला येथे आयोजन केला होते,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून,अकोला जिल्हाधिकारी कलेक्टर,खडसे साहेब विशेष म्हणजे कलेक्टर साहेबांनी कार्यक्रमांमध्ये अतिशय सुंदर भीम गीत म्हणून सम्राट अशोकाला अभिवादन केले,बंदोबस मध्ये असून सुद्धा कार्यक्रमाला,डाबकी रोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार,खंडारे साहेब,रमाबाई चौक महिला मंडळ,विशाखा बुद्ध विहार महिला मंडळ,सामाजिक व राजकीय संघटना,भिम नगर मधले जेष्ठ नागरिक,सर्व युवा वर्ग व सम्राट अशोक सेनेचे सर्व कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन चक्रवर्ती सम्राट अशोक यांना अभिवादन केले,तसेच कुस्तीमध्ये विदर्भ स्तरावर झालेल्या कुस्ती खेळाडू तरुण मुली,यांना टॉफी व मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,कलेक्टर साहेब व पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांना सम्राट अशोक यांचा फोटो देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व भीम गीतांचा कार्यक्रम भिमशाहिर,विनोद आठवले व त्यांचे संपूर्ण मंडळ यांनी अतिशय सुंदर भीम गीतांचे गाणे गाऊन प्रबोधन करून कार्यक्रमाला शोभा वाढवली,कार्यक्रम पाहण्यासाठी जुने शहर व संपूर्ण ग्रामीण भाग व आजूबाजूच्या परिसरात मधल्या नागरिकांनी,कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रम रात्री १० ला समाप्त करण्यात आला,कार्यक्रमाचे आयोजक,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाट,भीम नगर जुने शहर अकोला यांनी केले होते सदर कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME