दिघा विभागात श्री रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा.
दिघा विभागात श्री रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा.
ठाणे /नवी मुंबई (युगनायक न्युज नेटवर्क )
श्री.रामनवमी निमित्त दिघा विभागतील कन्हैयानगर येथे भाजपा वॉर्ड अध्यक्ष दिपक उपाध्याय यांच्या माध्यमातून श्री.रामप्रभू यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पालखी सोहळ्याला दिघा विभागातील असंख्य रामभक्तांनी उपस्थिती दर्शवत पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.तसेच पालखी मिरवणूक कन्हैयानगर ते इलठण पाडा व विष्णुनगर येथील विभागातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी भाजपा दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह ठाकूर,समाजसेवक अमित मिश्रा,समाजसेवक योगेश अभंग शिंदे,समाजसेवक गोविंद गहरवार व विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते...!
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME