रिठद येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM मशीनच चोरट्यांनी पळवली
रिठद येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM मशीनच चोरट्यांनी पळवली
जितेश गायकवाड -( युगनायक न्युज नेटवर्क )
रिसोड तालुक्यातील रिठद येथील बस स्टॅन्ड वरील बैंक ऑफ महाराष्ट्रची ATM मशीनच चोरटयानी दि.5 एप्रिल रोजी पहाटे 3 ते 3.30 वाजेदरम्यानची उचलून नेल्याची आढळून आले. सदर बँकेचे ATM सोबत चोरट्यानी हा प्रकार दुसऱ्यांदा केला असुन दोन्ही वेळेस चोरट्याच्या हाती अपयश आले आहे कारण मागील चोरीच्या वेळी सुद्धा ATM मध्ये पैसे नव्हते तेव्हा चोरट्यानी गॅस कटर चा उपयोग केला होता आणि या वेळी चोरट्यानी अक्षरशः मशीनच उचलून नेली परंतु या वेळी सुद्धा यांच्या पदरी अपयश आले कारण
विशेष म्हणजे या मशीन मध्ये रक्कम काहीच शिल्लक नव्हती अशी प्राथमिक माहिती आहे. बँकेकडून दि 04एप्रिल ला कॅश जमा केली जाणार होती. मात्र, काल टाकन्यात आली नाही. त्यामुळेच रक्कम वाचली. अंदाजे 5 क्विंटलच्या वर वजन असणारी, व जमिनीत नट बोल्ट लावून फिट असणारी मशीन सहजा सहजी कशी चोरुंन नेली. या बाबत गावकऱ्यांना चोरांची कामाचे आश्चर्य होत आहे व संपूर्ण गावात या चोरीची चर्चा होत आहे. 8 ते 10 चोरटयानी मशीनचा दरवाजा तोडून मोठ्या वाहनात मशीन टाकून नेल्याचे बोलले जात आहे.अश्या चोरीच्या वातावरणामुळे गावात भीतीचे वातावरणनिर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME