कु.निशिगंधा मानवतकर एम.जे.च्या अंतिम परीक्षेत विद्यापीठात तिसरी.
कु.निशिगंधा मानवतकर एम.जे.च्या अंतिम परीक्षेत विद्यापीठात तिसरी.
( -प्रतिनिधी दैनिक संवाद युगनायकांचा) परभणी येथील रवींद्रनाथ टागोर वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयाची (मास्टर ऑफ जर्नालिझम) एम.जे.ची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. निशिगंधा मानवतकर ही स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात तिसरी आली आहे.
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विभागाच्या वतीने २०२० यावर्षी (मास्टर ऑफ जर्नालिझम ) एम.जे च्या घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या असंख्य विद्यार्थ्यांमध्ये कु.निशिगंधा हिने विद्यापीठातून तिसरी येण्याचा मान मिळविला आहे.
कु.निशिगंधा मानवतकर हिने या अगोदर नामांकित वृत्तपत्रात बातमी संकलक म्हणून काम केले असून औरंगाबाद येथील पाॅलिटिकल रिसर्च ब्युरो मध्येही संपादकीय विभागात काम केले आहे..
कु. निशिगंधा मानवतकर ही प्रसिद्ध कवी, साहित्यिक डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांची कन्या असून तिने चित्रकलेच्या व संगीतकलेच्या क्षेत्रातही अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत. कु.निशिगंधा मानवतकर हिच्या या अभिमानास्पद यशाबद्दल रविद्रनाथ टागोर वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष प्राचार्य-डि .जे. सानप, प्रा.लताताई सानप, तसेच प्रा. डाॅ.मुजीब शेख, तसेच प्रा.संतोष भालके, प्रा.समीर कुरेशी, श्री मधुकर डोईफोडे, श्री मधुकर राऊत आदिंनी तिचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME