औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; ही ९ कागदपत्रे ग्राह्य

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; ही ९ कागदपत्रे ग्राह्य

नांदेड (युगनायक न्युज नेटवर्क) दि. ३० :- निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी  पत्रकानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० साठी मतदारांना सुकर मतदान करता यावे यासाठी पुढील ९ कागदपत्रे मतदाराची ओळख म्हणून पटविण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील. यात १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) पारपत्र (पासपोर्ट) ५) केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक संस्थेने वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) मा. खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाने वितर‍ित केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंतिम करण्यात आलेल्या मतदार यादीतील पात्र उमेदवारांना या ९ पुराव्यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करता येईल. सर्व पदवीधर मतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू