जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस, बँकेमध्ये ५ वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीस प्राधान्य

जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस, बँकेमध्ये

५ वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीस प्राधान्य

वाशिमदि. २७ : जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यानुसार  बँक व पोस्ट ऑफिसमध्ये होणाऱ्या आधार नोंदणीत आता ० ते ५ वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
इतर वयोगटांच्या तुलनेत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याबाबत आधार केंद्र चालक व संबधित शासकीय कार्यालयांची सभा २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२० पासून या बालकांच्या आधार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बँक व पोस्ट ऑफिसमध्ये होणाऱ्या आधार नोंदणीत ० ते ५ वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जावून आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची आधार नोंदणी करून आधार कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.





Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू