‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ वाशिम, दि. २८ (जिमाका) : जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २७ नोव्हेंबर २०२० च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
वाशिम, दि. २८ (जिमाका) : जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २७ नोव्हेंबर २०२० च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME