जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा
जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा
वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्हा न्यायालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश एस. एम. मेनजोगे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा, श्री. भरड, दिवाणी न्यायाधीश एस. पी. शिंदे, मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती फुलबांधे तसेच सर्व सन्माननीय न्यायाधीश, वकील उपस्थित होते.
याप्रसंगी ऍड. पी. पी. आंभोरे यांनी 'भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये' या विषयावर विचार व्यक्त केले. तसेच संविधान तयार करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती फुलबांधे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. आभार वकील संघाच्या अध्यक्ष ऍड. छाया मवाळ यांनी मानले
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME